म्हणून विद्या बालन पती निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांच्यासोबत सिनेमा करत नाही

By  
on  

आपल्या चोखंदळ भूमिकांसाठी बॉलिवूड अभिनेत्रींमध्येमध्ये विद्या बालन हे नाव आग्रहाने घेतलं जातं.  विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला मिशन मंगल हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले. म्हणूनच विद्याच्या आगामी सिनेमांकडे आता तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पण त्याच दरम्यान एका वेगळ्याच प्रश्नाने विद्या बालन च्या कारकिर्दीतील प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे ती म्हणजे तिचे पती सिद्धार्थ कपूर.  

आपल्या निर्मिती संस्थेमुळे सिद्धार्थ कपूर आज  आघाडीवर आहेत. त्यांनी बॉलिवूडला अनेक मोठे सुपरहिट सिनेमे दिले आहे.  त्यात या दंगल एबीसीडी चेन्नई एक्सप्रेस आणि  बर्फी हे सिनेमे दिले आहेत.  मात्र त्यांच्या घनचक्कर या सिनेमाव्यतिरिक्त विद्याने कोणत्याच सिनेमात अभिनय साकारलेला नाही.  म्हणूनच पतीसोबत कुठलाही सिनेमा  न करण्याविषयी एका मुलाखतीत तिला प्रश्न केला गेला या प्रश्नांचं  मजेदार  उत्तर देताना विद्या बालन म्हणते, " कुठलाही निर्मात्यानं सोबत मला काही अडचण असेल तर ती मी चर्चा-विनीमय करुन तो सिनेमा सोडू शकते मी त्यांच्यासोबत माझे विचार मांडले एखादा सल्ला देते. पण कदाचित सिध्दार्थसोबत असं करताना जरा अवघड आहे. 

 

विद्या पुढे म्हणते, " एखाद्या स्क्रिप्टवर माझं आणि सिध्दार्थ दोघांचंही एक मत होतं. पण मी त्यांच्यासोबत पैशांची बातचित करु शकत नाही. त्यांना वाटत असेल की मला त्या सिनेमासाठी इतकी अमाऊंट मिळावी, तर मला त्या अमाऊंटबाबत समाधानकारक वाटत नसेल. म्हणून मग मला वाटेल की ते माझं अवमूल्यन करतायत म्हणूनच मी त्या परिस्थितीपर्यंत जाण्याचं कटाक्षानं टाळते आणि आमच्या दोघांचं नातं टिकवण्यासाठी हा वैचारिक निर्णय घेतलला खरंच चांगला आहे."
ठी

Recommended

Loading...
Share