By  
on  

Birthday special: बॉलिवूडचा अ‍ॅक्शन किंग अक्षय कुमारला पडलीय मराठी सिनेमांची भुरळ

अभिनेता अक्षय कुमारच्या बॉलिवूडमधील योगदानाबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. पहिला सिनेमा ‘सौगंध’ ते अलीकडेच रिलीज झालेला ‘मिशन मंगल’ या सिनेमापर्यंत अक्षय कलाकार म्हणून अधिक प्रगल्भ होत गेला आहे. खट्याळ प्रियकर, अतरंगी अभिनेता, दिलदार मित्र, देशासाठी उभा ठाकलेला जिद्दी सैनिक अशा अनेक भूमिकांमधून तो आपल्याला भेटला आहे भावला आहे. सुरुवातीला अ‍ॅक्शन सिनेमांना प्राधान्य देणारा अक्षय आता सामाजिक विषयावरील सिनेमांमध्येही उत्तम भूमिका साकारत आहे.

बॉलिवूडच्या या इंटरनॅशनल खिलाडीला सर्वात जास्त प्रेम वाटते ते मराठी भाषेबद्दल. अक्षय बराच काळ मुंबईत राहिला आहे. इथल्या समाजजीवनाला त्याने जवळून पाहिलं आहे. त्यामुळेच अक्षय उत्तम मराठी बोलू शकतो. त्याला मराठी भाषेविषयी विशेष प्रेम आहे. पण अक्षयचं मराठी प्रेम केवळ दिखाव्यासाठी नाही तर अक्षय मराठी सिनेमांचीही निर्मिती केली आहे आणि पुढेही करत राहील. 

अक्षयने निर्मिती केलेला पहिला दर्जेदार सिनेमा म्हणजे ‘72 मैल एक प्रवास’ गरीब आई आणि तिच्या मुलांच्या स्वाभिमानाची गोष्ट या सिनेमात दिसली आहे. या सिनेमात या कुटुंबाची दैन्यावस्था पाहून प्रत्येकाला पाझर फुटतोच. याशिवाय अक्षयने ‘चुंबक’ नावाच्या दुस-या सिनेमाची निर्मिती केली.

एक 15 वर्षीय गरीब मुलगा आणि एक मध्यवयीन गतिमंद गृहस्थ यांच्या जीवनाचा वेध घेणारी हद्यस्पर्शी गोष्ट म्हणजे चुंबक. प्रसन्न ठोंबरे ही व्यक्तिरेखा स्वानंद किरकिरे यांनी साकारली होती. तर ‘डिस्को’ ही दुसरी महत्तव्पूर्ण व्यक्तिरेखा संग्राम देसाई या कुमारवयीन युवकाने साकारून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. संदीप मोदी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमालाही रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. स्वानंद किरकिरे यांना या सिनेमातील भूमिकेसाठी यंदाचा सर्वौत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive