अक्षय कुमारने मुलाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली ही खास पोस्ट

By  
on  

बॉलिवूडचा ‘इंटरनॅशनल खिलाडी’ अक्षय कुमारचा मुलगा आरव याचा आज 17 वा वाढदिवस आहे. यावेळी अक्षयने सोशल मिडिया हॅण्ड्लवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात अक्षयच्या वडिलांनी त्याला दिलेला संदेश पोस्ट केला आहे.

 

या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘मी माझ्या वडिलांकडून एक गोष्ट शिकलो आहे. जेव्हा मी कधी चुक करायचो ते मला माफ करायचे. मला असं कधीच वाटलं नाही की ते मला शिक्षा करतील. आज तुला पाहून मलाही हेच वाटतं. मी पिता म्हणून योग्य आहे याची खात्री पटते. मी तुला मार्गदर्शन करण्यासाठी कायम सोबत आहे. हॅपी बर्थ डे आरव.’ यावर ट्वींकलनेही पोस्ट शेअर करत आरवला शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय सध्या सुर्यवंशी, लक्ष्मी बाँब, गुड न्युज या सिनेमातून रसिकांसमोर येत आहे.

Recommended

Loading...
Share