दीपिका पादुकोणने मानसिक स्वास्थ्यावर आधारित लेक्चर सिरीज केली लॉंच

By  
on  

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी एका लेक्चर सिरीज लॉंच केली आहे. दीपिकाने हे द लाईव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन अंतर्गत सुरु केलं आहे. रविवारी 15 सप्टेंबर रोजी दीपिकाने एका लेक्चर सिरीजसह याची सुरुवात केली. तिच्या या सिरीजच्या शुभारंभप्रसंगी वडील प्रकाश पादुकोण ,आई उज्ज्वला पादुकोण आणि बहिण अनिशासुध्दा उपस्थित होती. तसंच ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांची ह्या कार्यक्रमाला खास उपस्थिती होती. 

दीपिकाने 2015 मध्ये या फाऊंडेशनची सुरुवात केली होती. ही लेक्चर सिरीज जगातील विविध भागातील विभिन्न पेशाच्या लोकांना आमंत्रित करण्यासाठी आहे. जे आपल्या मानसिक स्वास्थ्यासंदर्बात जागरुक आहेत, त्यांचा प्रवास आणि अनुभवाबद्दल या फाऊंडेशनमार्फत वार्तालाप केला जाईल. 

 

Recommended

Loading...
Share