ब्रेकअपनंतर प्रथमच रणबीर कपूर आणि कतरीना कैफ या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

अभिनेत्री कतरीना कैफ आणि रणबीर कपूर कोणे एकेकाळी रिलेशनशिपसाठी चर्चेत होते. परंतु यांची रिलेशनशिप फार वेळ टिकली नाही. दोघांच्या ब्रेकअप अंतर या दोघांना पुन्हा ऑनस्क्रीन पाहण्यास त्यांचे चाहते दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत होते. अखेर या दोघांच्या फॅन्ससाठी खुशखबर असून या दोघे पुन्हा एकत्र झळकणार आहेत. हा कोणता सिनेमा नसून ती एका नामांकित कंपनीची जाहिरात आहे. या जाहिरातीत या दोघांसोबत रॅपर बादशाह सुद्धा दिसून येत आहे. 

कतरीना आणि रणबीर हे एका अग्रगण्य मोबाईल कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर बनले आहेत. कतरीना आणि रणबीर २०१६ मध्ये 'जग्गा जासूस' प्रदर्शित झाल्यानंतर तीन वर्षांनंतर या जाहिरातीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. या जाहिरातीत हे दोघं मित्र-मैत्रीण असलेले पाहायला मिळत आहेत. 

रणबीर कपूर सध्या 'ब्रम्हास्त्र'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात रणबीरसोबत अमिताभ बच्चन, आलिया भट, नागार्जुन प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर कतरिना कैफ अक्षय कुमार सोबत 'सूर्यवंशी' सिनेमात झळकणार आहे. 

Recommended

Loading...
Share