मोहित सुरीच्या ‘एक व्हिलन’च्या सिक्वेलमध्ये जॉन अब्राहमची निगेटीव्ह भूमिका?

By  
on  

मोहित सुरी ‘एक व्हिलन’च्या सिक्वेलच्या तयारीला लागला आहे. या सिनेमातील नकारात्मक भूमिकेसाठी जॉन अब्राहमला विचारणा करण्यात आल्याचं समोर आलं आहे. एका वेबपोर्टलने ही बातमी दिली आहे. मागील भागात ही भूमिका रितेश देशमुखने साकारली होती.

रितेशनंतर जॉनला किंवा त्याच्या बरोबरीचा एखादा कलाकार व्हिलनच्या भूमिकेसाठी निवडण्याचा दिग्दर्शकाचा मानस आहे. एक व्हिलनपेक्षा मोठ्या तत्त्वावर हा सिनेमा बनवण्याचा दिग्दर्शकाचा मानस आहे. हा सिनेमाही ‘बालाजी’ कडूनच निर्माण केला जाणार असल्याचं समोर येत आहे. ‘मलंग’ हा सिनेमा हातावेगळा केल्यानंतर मोहित हा सिनेमाच्या तयारीला लागणार असल्याचं बोललं जात आहे.

Recommended

Loading...
Share