'कुली नंबर 1'च्या सेटवर लागलेल्या आगीमुळे मेकर्सना झालं 2.5 कोटींचं नुकसान

By  
on  

करिष्मा कपूर आणि गौविंदा स्टारर 'कूली नं 1' ह्या सुपरहीट सिनेमाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता वरुण धवन प्रमुख भूमिकेत आहेत. ह्या सिनेमाचं शूटींग सध्या जोरदार सुरु आहे. पण नुकतंच ह्या सिनेमाबाबत एक अघटित घटना घडली. 11 सप्टेंबर 2019 रोजी सिनेमाच्या सेटवर अचानक आग लागली आणि त्यामुळे सेटचं बरंचसं नुकसान झालं आहे. कास्ट आणि क्रूपैकी कोणीही त्यावेळेस उपस्थित नसल्याने कोणीही जखमी झालं नाही परंतु लाईट्सचं बरंचसं नुकसान झालं. 

सूत्रांच्या माहितीनुसार सेटवर लाईटचा सप्लाय करणा-या थर्ड पार्टीला बरंचसं नुकसान झालं आहे. फिल्मच्या मेकर्सना जवळपास 2 ते 2.5 कोटींचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. तसंच 125 कोटींच्या इशुरन्स अंतर्गत ही नुकसान झालेली रक्कम भरुन काडम्यात येईल. इशुरन्स विभागाच्या अधिका-यांनी नुकताच सेटचा दौरा केला आहे, ते जेव्हा रिपोर्ट फाईल करतील त्यानंतरच क्लेमची प्रोसेस सुरु होईल. 

 

 

Recommended

Loading...
Share