झाशीच्या राणीची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर, हे कलाकार झळकणार महत्वपूर्ण भूमिकेत

By  
on  

झाशीच्या राणीची कहाणी आपल्या सर्वांना माहित आहे. हीच कहाणी आता मोठ्या पडद्यावर सजणार आहे. 'द वॉरियर क्वीन ऑफ झांसी' हा झाशीच्या राणीची शौर्यगाथा सांगणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे काही मराठी कलाकार या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. 

यतीन कार्येकर, अजिंक्य देव या मराठी कलाकारांची या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहे. तसेच अमेरिकास्थित मराठमोळी अभिनेत्री देविका भिसे या सिनेमात झाशीच्या राणीची प्रमुख भूमिका साकारत आहे. देविका भिसे याआधी 'द मॅन व्हु न्यु इनफिनीटी' या हॉलिवूड सिनेमात अभिनेता देव पटेलसोबत झळकली होती. 

 

'द वॉरियर क्वीन ऑफ झांसी' सिनेमात मराठी कलाकार आणि मराठी भाषेचा थोडा अंश पाहायला मिळणार आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईची शौर्यगाथा पाहायला सर्वजण उत्सुक आहेत. हा सिनेमा मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये १५ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे .

Recommended

Loading...
Share