पाहा Video : शिल्पा शेट्टीने प्लेट्स तोडल्या आणि त्याच्यावर; सुसाट नाचली

By  
on  

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या इंस्टाग्राम हॅंडलवरुन एक व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला आहे. पण हा व्हिडीओ पाहून तुम्हालासुध्दा आश्चर्याचा धक्का बसेल. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. एका रेस्टॉंरंटमध्ये शिल्पा शेट्टी जमिनीवर चक्क काचेच्या प्लेट्स तोडताना पाहायला मिळतेय. आणि त्याच तोडलेल्या प्लेट्सवर मस्त नाचताना पाहायला मिळतेय. या व्हिडीओत शिल्पा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत धम्माल करतेय. तसंच एक मजेशीर कॅप्शनसुध्दा या पोस्टला तिने दिलं आहे. 'प्लेट्स तोडा आणि धुण्यापासून वाचवा'. तसंच तिने पुढे हे पण म्हटलं आहे,  की सर्व नकारात्मकता या प्लेट्ससोबत चकनाचूर करा आणि डान्स करा.

परंतु शिल्पाच्या डान्सचा हा अनोखा फंडा नेटक-यांना मात्र भावलेला नाही. त्यांनी मात्र तिच्या हया कृत्यावर कमेंट्सचा वर्षाव करत तिला चांगलंच धारेवर धरलंय. एका युजरने म्हटलंय, पैसा खुप आहे ना तुम्हा लोकांकडे .प्लेट्स तोडणं तुम्हाला खुप आवडतं ना, पण जरा विचार करा जे लोक ते विकत नाही घेऊ शकत. हे पूर्णपणे वायफळ आहे. 

Recommended

Loading...
Share