By  
on  

पाहा Video: अभिनेता अक्षय कुमारची गुपचुप मेट्रोवारी

कलाकार कधी काय करतील याचा नेम नाही. त्यातही अक्षय कुमारसारखा अतरंगी कलाकार काय करेल हे तर अजिबात सांगता येत नाही. नुकताच त्याने घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोने प्रवास केला. अक्षयसोबत ‘गुड न्युज’ सिनेमाचे दिग्दर्शक राज देखील होते. यावेळी अक्षयने एक व्हिडियो शेअर केला आहे. विशेष म्हणजे यावेळी अक्षयला फारसं कुणी ओळखलं नाही.

 

अक्षय घाटकोपरला शुटिंग करत होता. पण त्याला वर्सोवाला शुटिंगसाठी लवकर पोहोचायचं होतं. पण कारने जाण्यासाठी त्याला दोन तास लागणार होते. अशा वेळी त्याने मेट्रोने जाण्याचं ठरवलं. ते ही गर्दीच्या वेळी. या व्हिडियोतही अक्षयच्या चेह-यावरील उत्साह लपून राहत नाहीये. अक्षयने सध्या सुर्यवंशी सिनेमाचं शुटिंग संपवलं आहे. आता तो करीना कपूरसोबत गुडन्युज सिनेमाच्या तयारीत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive