By  
on  

Birthday Special : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री करिना कपूरबद्दल या खास गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

बॉलिवूडची सर्वांग सुंदर अभिनयसम्राज्ञी असं बिरुद मिरवणारी अभिनेत्री करिना खपूरचा आज वाढदिवस.  'अशोका', 'चमेली', 'कभी खुशी कभी गम','ओमकारा', 'डॉन', '3 इडियट्स', 'बॉडीगार्ड', 'तलाश', 'बजरंगी भाईजान' ,'वीरे दी वेडींग' अशा अनेक सिनेमांमधून करिनाने आपली छाप पाडली आहे. बॉलिवूडच्या तिन्ही खानसोबत म्हणजेच सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान ह्या तिन्ही खानसोबत काम करण्याची किमया तिने साधली आहे. करिना खानच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दल ह्या खास गोष्टी जाणून घ्या. 

 

  • करिना कपूर खानचा जन्म  21 सप्टेंबर 1980 रोजी मुंबईत झाला.

  • करिनाला कुटुंबिय आणि जवळचे मित्र-मंडळी बेबो ह्या नावाने हाक मारतात. 

  • करिना अभिनेते रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता ह्यांची मुलगी आहे. 

   

  •   80-90 च्या दशकांत बॉलिवूड गाजवणा-या अभिनेत्रींपैकी आघाडीची अभिनेत्री करिष्मा कपूर ही करिनाची मोठी बहिण

 

  •      बॉलिवूड आणि फिल्म इंडस्ट्रीसाठी प्रसिध्द असलेलं  कपूर घराण्यात करिना जन्मली. त्यामुळे अभिनय आणि इंडस्ट्रीसाठीचं बाळकडूच तिला घरात मिळालं

 

 

  •  2000 साली करिनाने रेफ्यूजी'  ह्या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

 

  •  अभिनेते ऋषी कपूर हे करिनाचे काका आहेत तर अभिनेता रणबीर कपूर तिचा सख्खा भाऊ 

  •     करिना कपूरच्या लव्ह अफेअरची बरीच चर्चा रंगली होती. अभिनेता शाहिद कपूर आणि करिनाचं प्रेमप्रकरण बरंच चघळलं गेलं. त्यांच्या किसींगचा एक व्हिडीओसुध्दा तेव्हा बराच व्हायरल झाला होता. 

  •      त्यानंतर करिनाने 2012 साली छोटा नवाब म्हणजेच अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केलं 

 

  •     करिना आणि सैफ अली खान ह्यांना 2.5 वर्षांचा गौंडस तैमूर मुलगा आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Birthday Saifu #besthusbandever

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

       

  •     तैमूरच्या जन्मानंतरही करिना कपूरने आपली सिनेमांतील अभिनय कारकिर्द सुरुच ठेवली  आहे. 

   

 

बॉलिवूडच्या ह्या सौंदर्यवती अभिनेत्रीला वाढदिवसानिमित्त पिपींगमून मराठीकडून खुप खुप शुभेच्छा !

 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive