By  
on  

'दबंग 3' साठी सलमान खान लेखक नाही

'भारत' नंतर सलमान खानच्या दबंग 3 सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दबंग फ्रेंचायझीचा हा तिसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहेे. आपल्या सिनेमांमध्ये जातीनं लक्ष घालणा-या कलाकारांपैकी सलमान खान एक  आहे. सलमानच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खान दबंग 3 च्या संवांदांमध्ये आणि अॅक्शन सीन्समध्ये स्वत: लक्ष देतोय. त्य़ाला त्याचे इनपूट्स ह्या प्रोजेक्टमध्ये देणं महत्त्वाचं वाटतंय. 

एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भाईजानने  दबंग 3 च्या  संवांद लेखनामध्ये विशेष योगदान दिलं आहे. पण तो यासाठी संवादलेखक बनलेला नाही. तो लेखक झाल्याच्या बातम्या फक्त अफवाच आहेत. इतकंच नव्हे तर काही अॅक्शन सीन्स सिनेमासाठी सलमाननेच कोरिओग्राफ केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता चाहत्यांना या सिनेमाची खुप आतुरता लागून राहिली आहे.. 

Recommended

PeepingMoon Exclusive