By  
on  

लारा दत्ता , प्रियांका चोप्रा आणि दिया मिर्झा यांचा 20 वर्षांपूर्वीचा हा फोटो तुम्ही पाहिलात का?

वेळ कधी कसा वा-यासारखा उडून जातो हे आपलं आपल्यालाच कळत नाही. आपण आपल्या आठवणींचा कोलाज फोटोंमध्ये पाहतो आणि आपण किती पुढे निघून आलो याची प्रचिती आपल्याला येते. आपल्याला बॉलिवूडचे काही जुने फोटो पाहूनसुध्दा असंच वाटतं. सर्व किती क्षणार्धात बदललं असं हे फोटो पाहून वाटतं. पण त्यासाठीचा संघर्षसुध्दा तितकंच महत्वाचं असतो. अशीच एक नॉस्टॅलॅजिक फिलींग देणारा फोटो लारा दत्ताने आपल्या सोशल  मिडीया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. 

या फोटोमध्ये लारा दत्ता बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दिया मिर्झा यांच्यासोबत दिसतेय. 2000 सालचा हा जुना फोटो आहे. मिस यूनिवर्स-लारा दत्ता, मिस एशिया-दिया मिर्जा आणि मिस वर्ल्ड-प्रियंका चोप्रा आपल्या क्राऊनसोबत पोज देताना पाहायला मिळतायत. ह्या फोटोला लाराने आत्ताच्या फोटोंसोबत कोलाज केला आहे. त्यामुळे ह्या अभिनेत्रींचा तेव्हाचा आणि आत्ताचा  लूकमधील फरक साफ स्पष्ट होतो आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive