By  
on  

......म्हणून सोनाक्षी सिन्हावर नेटक-यांची ‘ट्रोलधाड’

सोनी टीव्हीवर लागणारा ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो अनेकांचं मनोरंजन करतोच याशिवाय ज्ञानात भरही घालतो. पण या कार्यक्रमात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने दाखवलेल्या ‘अगाध’ ज्ञानामुळे तिच्यावर ट्रोल व्हायची वेळ आली आहे.

.

या कार्यक्रमात सोनाक्षीला प्रश्न विचारला गेला होता की, ‘हनुमानाने संजीवनीबुटी कुणासाठी आणली होती’? यावर पर्याय होते सुगीव, लक्ष्मण, सीता, राम. यावर सोनाक्षी आणि सहपार्टनर रुमादेवी दोघींनी लाईफलाईन घेतली. इतक्या साध्या प्रश्नाचंही उत्तर सोनाक्षीला न आल्याने नेटिझन्सने चांगलंच ट्रोल केलं. विशेष म्हणजे होस्ट अमिताभ बच्चन यांनीही सोनाक्षीची फिरकी घेतली.

 

सोनाक्षीच्या बंगल्याचं नाव रामायण आहे. याशिवाय तिच्या वडिलांचं नाव शत्रुघ्न आहे आणि तिच्या काकांचं नाव राम, लक्ष्मण, भरत हे आहे तरीही तिला या प्रश्नाचं उत्तर न आल्याने ट्रोल केलं गेलं.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive