By  
on  

अपना टाईम आ गया ! ‘गली बॉय’ करणार ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व

बॉलिवूड सिनेमा ‘गली बॉय’ला ऑस्कर सोहळ्यात भारताचं प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली आहे. बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म कॅटेगरीमध्ये हा सिनेमा निवडला गेला आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणा-या आणि झोपडपडपट्टीतील बिकट परिस्थितीमध्ये राहणा-या 26 वर्षीय डिव्हाईन या धारावीतील रॅपर तरुणाच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे. या तरुणाची भूमिका रणवीरने साकारली आहे. या मुलाला रॅपर व्हायचं असतं. पण आजूबाजूचं वातावरण त्याला पूरक नसतं.

 

या सिनेमामध्ये धारावीतील आसपासचा परिसर दाखवण्यात आला आहे. या सिनेमात आलिया भट, अमृता सुभाष आणि कल्की कोचालिन यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. या सिनेमात त्याच्यासोबत आलिया भट्टही आहे. या सिनेमाने ट्रेलर, टीजर तसेच रिलीज झालेली गाणी या सर्वच बाबतीत प्रेक्षकांचं मन जिंकलं. झोया अख्तरने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive