By  
on  

Exclusive: ‘गली बॉय’ सिनेमाचा भाग असल्याचा आनंद : अमृता सुभाष

बॉलिवूड सिनेमा ‘गली बॉय’ला ऑस्कर सोहळ्यात भारताचं प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली आहे. बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म कॅटेगरीमध्ये हा सिनेमा निवडला गेला आहे. यावेळी गली बॉयमध्ये रणवीरच्या आईची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अमृता सुभाष हिच्याशी ‘पीपिंगमून मराठी’ने बातचीत केली.

 

अमृता म्हणते, ‘मी गली बॉय सिनेमाचा भाग आहे याचा अत्यंत आनंद होत आहे. माझा आणखी एक सिनेमा ‘श्वास’ देखील ऑस्करसाठी निवडला गेला होता. आता ‘गली बॉय’ची देखील निवड झाल्याने माझा आनंद वाढला आहे. ‘गली बॉय’ आपल्या प्रत्येकाच्या मनाला जोडणारा धागा आहे. तो एक वैश्विक विषय वाटतो मला. हे आमच्या सगळ्या टीमचं यश आहे.’

Recommended

PeepingMoon Exclusive