माधुरी दीक्षिसोबत 'पिंगा' घालणार प्रियांका चोप्रा

By  
on  

भारतीय टेलिव्हिजनचा लोकप्रिय डान्स रिएलिटी शो 'डान्स दीवाने'चा सध्या दुसरा सीझन सुरु आहे. अर्जुन बिजलानी होस्ट करत असलेला हा शो माधुरी दीक्षित , शशांक खेतान आणि तुषार कालिया जज करतात. अनेक येऊ घातलेल्या सिनेमांची टीम प्रोमोशनसाठी या शोमध्ये आवर्जुन हजेरी लावते. लवकरच या शोमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अभिनेता फरहान अख्तर आपला आगामी सिनेमा 'द स्काय इज पिंक'च्या प्रोमोशनसाठी उपस्थित राहणार आहेत. प्रियांकासाठी हा सिनेमा म्हणजे बराच काळानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन ठरतोय. 

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीनुसार, अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अभिनेता फरहान अख्तर आपला आगामी सिनेमा 'द स्काय इज पिंक'चं जोरदार प्रोमोशन 'डान्स दीवाने'च्या मंचावर करणार आहेत. फक्त इतक्यावरच ते थांबणार नाहीत, तर देसी गर्ल प्रियांका चोप्रा 'बाजीराव मस्तानी'चं गाणं 'पिंगा' वर माधुरीसोबत थिरकणार आहे. ह्या मूळ गाण्यात प्रियांकासोबत दीपिका झळकली होती. 

माधुरी आणि प्रियांकाचा  'पिंगा' मुळे 'डान्स दीवाने'चा हा एपिसोड पाहणं खुपच औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Recommended

Loading...
Share