By  
on  

मांजरेकरांच्या सईचा भाईजानसोबतचा हा 'दबंग' लुक पाहा

मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टी गाजवणा-या महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर आपल्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. महेश मांजरेकर यांचा बेस्ट फ्रेंड सलमान खान तिला आपल्या दबंग 3 या सिनेमाद्वारे इंडस्ट्रीत लॉंच करतोय हे, आपण सर्वच जण जाणतोय. सर्वांनाच 'दंबंग 3'  सिनेमातील सईच्या भूमिकेविषयी आणि नव्या लुकविषयी प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. पण आत्ता खुद्द भाईजाननेच यावरचा पडदा उलगडला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामवरुन सईसोबतचा दंबंग 3 च्या सेटवरुन एक झक्कास फोटो शेअर केला आहे. ह्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

खरं तर सईचा या सिनेमातील लूक लिक होऊ नये् म्हणून भाईजानने यापूर्वीच खुप खबरदारी घेतली होती. तसंच सेट्सवर जामर लावल्याचंसुध्दा बोललं जात होतं. सलमानने ह्या सईला घेऊन नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या आयफा अवॉर्ड्स 2019 मध्ये शानदार एन्ट्री घेतली होती. सलमानसोबत ग्रॅंड एन्ट्री घेतल्याने सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

On location #dabangg3 . . . @saieemmanjrekar

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive