श्रीदेवीच्या बायोग्राफीमध्ये काजोलचं असंही योगदान

By  
on  

श्रीदेवी हे नाव आजही अनेकांना दर्जेदार सिनेमांची आठवण करून देतं. श्रीदेवीला जाऊन एक वर्षाहून अधिक कालावधी लोटला तरी चाहत्यांच्या मनातून तिची छबी पुसली गेली नाही. आता श्रीदेवी बायोपिकच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. सत्यार्थ नायक या बायोग्राफीचे लेखक आहेत. श्रीदेवीच्या बायोग्राफीची प्रस्तावना काजोलने लिहिली असल्याचं समोर येत आहे.

एका प्रथितयश वृत्तपत्राशी बोलताना काजोल म्हणते, ‘ मी श्रीदेवीला चंदेरी पडद्यावर पहात मोठी झाली आहे. ती अभिनयाचं विद्यापीठ होती. ती कायमच आवडती अभिनेत्री राहील. मी त्यांच्याविषयी काही लिहीत आहे. त्यामुळे मी खुश आहे की ही संधी मिळाली.’ खुद्द लेखक सत्यार्थ नायक यांच्या मतेदेखील श्रीदेवीबद्दल लिहायला काजोल परफेक्ट चॉईस आहे. काजोल इंडस्ट्रीमध्येच मोठी झाली आहे. श्रीदेवील पाहत तिचं बालपण सरलं आहे. तिने श्रीदेवीविषयी खुपच उत्तम लिहिलं आहे.’ काजोल काही दिवसांपुर्वी ‘हेलिकॉप्टर ईला’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला आली होती.

Recommended

Loading...
Share