By  
on  

जेव्हा अक्षय कुमार पत्रकाराची मराठीतून समजूत घालतो तेव्हा.........

अक्षय कुमारला मराठी येतं हे सगळ्यांनाच ठावूक आहे. पण अक्षय उत्तम मराठी बोलू शकतोच याशिवाय एखाद्याची समजूत घालू शकतो. असाच किस्सा ‘हाऊसफुल 4’च्या ट्रेलर लाँचवेळी घडला. या इव्हेंटवेळी एका पत्रकाराने  अक्षयला मराठी भाषेत बॉलिवूड कलाकारांच्या चॅरिटीबद्दल प्रश्न विचारला.

 

त्यावेळी अक्षयने त्याला मराठीत बॉलिवूडमध्ये केवळ मीच चॅरिटी करत नाही. मी इंड्स्ट्रीमध्ये आहे त्यामुळे आपल्याला सांगू शकतो.’ ‘मी असू दे किंवा सलमान आम्ही सगळेच चॅरिटी करतो.’ त्यावर पत्रकाराने तुमच्याबद्दल आणि सलमान माहीत आहे पण इतर कलाकारांच्या चॅरिटीविषयी शंका उपस्थित केल्यानंतर अक्षयने त्याची ‘अरे ! मी सांगतो ना भाऊ...’ असं म्हणत समजूत घातली. या इव्हेंटसाठी हाऊसफुल 4चे कलाकार सिनेमातील गेट अपमध्येच आले होते. अक्षयनेही राजाच्या वेष केला होता सोबतच मिशी आणि डोक्याला टक्कल ही होतं. हाऊसफुल 4ची कथा पुनर्जन्मावर आधारलेली आहे. साजिद नाडियाडवाला या सिनेमाचे निर्माते आहेत तर फरहाद सामजींनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा 25 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive