प्रियांका चोप्रा लवकरच दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार?

By  
on  

अभिनेत्री प्रियांका चोप्रा बराच काळ बॉलिवूडपासून लांब होती. हॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख बनवल्यानंतर ती ‘द स्काय इज पिंक’ सिनेमातून रसिकांच्या समोर येत आहे. या सिनेमात ती अभिनयही करत आहे याशिवाय निर्मातीही आहे. आता प्रियांका दिग्दर्शनात पाऊल ठेवणार का अशी चर्चा सुरु आहे.

 

पुर्वी प्रियांकाने व्हेंटिलेटर या मराठी सिनेमाचीही निर्मिती केली होती. त्यावेळी दिग्दर्शन करताना ताण जाणवतो असं तिने बोलून दाखवलं होतं. पण तिने नुकतंच केलेल्या विधानावरून असं लक्षात येत आहे की देसी गर्ल दिग्दर्शनातही हात आजमावण्यास उत्सुक आहे. प्रियांका म्हणते, ‘दिग्दर्शन ही खुप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे मला कायमच ताण जाणवतो. मी अभिनयाकडून प्रॉडक्शनकडे वळले आहे. आशा आहे लवकरच दिग्दर्शनाकडे जाईन.’ प्रियांका 3 वर्षांनंतर हिंदी सिनेमात दिसणार आहे. ‘द स्काय इज पिंक’ सिनेमा 11 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share