'वास्तव'ला वीस वर्ष पुर्ण, या सिनेमाने माझ्यातल्या कलाकाराचा शोध घेता आला: संजय दत्त

By  
on  

आजही 'पचास तोला' हा डायलाॅग आठवला की संजय दत्तची प्रमुख भुमिका असलेल्या 'वास्तव' सिनेमाची हटकुन आठवण होते. 1999 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला आज 20 वर्ष पुर्ण झाली आहेत. मुंबईतील गुन्हेगारी दुनियेचं काळी बाजु दाखवणारा हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 

संजय दत्तने नुकतंच 'वास्तव'मधील लोकप्रिय 'पचास तोला'चा प्रसंग शेयर करुन 'वास्तव'च्या आठवणींना उजाळा दिला. 'वास्तवला आज 20 वर्ष पुर्ण होत आहेत. या सिनेमामुळे माझ्यामध्ये दडलेल्या कलाकाराचा अनुभव मला घेता आला.' अशी पोस्ट संजय दत्तने लिहीली आहे. 

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वास्तव' सिनेमात संजय दत्तसह रिमा लागु, शिवाजी साटम, परेश रावल, मोहनीश बहल, संजय नार्वेकर, नम्रता शिरोडकर यांनी प्रमुख भुमिका साकारल्या आहेत. 

संजय दत्त सध्या 'KGF2' च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. यासोबत संजय दत्त 'सडक 2' आणि आशुतोष गोवारीकर यांच्या 'पानीपत' मध्ये सुद्धा झळकणार आहे.

Recommended

Loading...
Share