प्रियांका चोप्रा म्हणते, 'मला आई व्हायचंय'

By  
on  

प्रियांका चोप्राचा द स्काय इज पिंक हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल तीन वर्षांनंतर ती बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. ह्या सिनेमाची ती निर्मातीसुध्दा आहे. 'द स्काई इज पिंक' ह्या सिनेमाचं प्रियांका भारतात व अमेरिकेत जोरदार प्रमोशन करतेय. ह्या प्रमोशनदरम्यान निरनिराळ्या मुलाखतींना ती सामोरी जातेय. 

बॉलिवूड-हॉलिवूडचा संगम असलेलं प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे सर्वात ट्रेंडीग व मोस्ट लव्हेबल कपल. म्हणूनच तिच्या फॅमिली प्लॅनिंगबद्दल चाहत्यांसह माध्यमांनसुध्दा बरीच उत्सुकता आहे. म्हणून तिच्या प्लॅनिंगबद्दल तिला एका मुलाखतीत नुकतीच विचारणा करण्यात आली. 

प्रियांका या प्रश्नावर हसून उत्तरली, "खरं सांगायचं तर मी आता आणखी वाट पाहू शकत नाही. मला आई व्हायचंय आणि ह्यासाठी मी खुप उत्साही आहे. देवाच्या कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यात आई-वडील होण्याचे सुंदर क्षण येतात. मी व निकसुध्दा त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय" . पीसीच्या ह्या उत्तरानंतर चाहत्यांमध्ये सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. 

 ‘द स्काय इज पिंक’ सिनेमा 11 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share