By  
on  

The sky is pink Review: जाणीवेने जगण्यास शिकवणारा सिनेमा

सिनेमा: ' द स्काई इज पिंक'
कलाकार: प्रियंका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसीम आणि रोहित सराफ 
दिग्दर्शक: शोनाली बोस 
रेटिंग्स: 4 मून्स

ही एका अशा जोडप्याची गोष्ट आहे, ज्यांना मुलीचं आजारपण एकत्र आणतं. हा सिनेमा हळूवार, भावनाप्रधान आहे. पण जाताना नक्कीच काहीतरी देऊन जातो. 

 

कथानक: 
लग्नाला 25 वर्षं झालेल्या आदिती चौधरी (प्रियांका चोप्रा) आणि निरेन चौधरी (फरहान अख्तर) जोडप्याची मुलगी आयेशा ही पल्मोनरी फाइब्रोसिस या विकाराने पिडित असते. आयेशाला एक भाऊही असतो त्याचं नाव ईशान (रोहित सराफ ) असतं. आयेशाच्या आजारपणामुळे सगळ्या घरावर उदासीची छाया असते. पण यातूनही उलगडत जाणारे नात्यातील गुंते प्रेक्षकांना अधिक भावतात. 
दिग्दर्शन: 
शोनाली बोसला सिनेमाची भट्टी उत्तम जमलीये. सिनेमातील संवाद त्यात भर टाकतात. त्यामुळेच सिनेमातील व्यक्तिरेखा आपल्यातील वाटू लागतात. 
अभिनय: 
दर्जेदार अभिनय हा सिनेमाची जमेची बाजू. तीन वर्षांनी हिंदी सिनेमात दिसलेली प्रियांका मनाला भावते. तर फरहानने साकारलेला निरेन भाव खाऊन जातो. उत्तम अभिनय साकारुनही झायराने या सिनेमानंतर बॉलिवूडला अलविदा केला हे लक्षात येतं त्यावेळी मनाला चुटपुट लागून राहते. रोहितचा अभिनयही उत्तम आहे. तीन प्रसिद्ध कलाकार असूनही त्याचा अभिनय दबलेला वाटत नाही. 
सिनेमा का पहावा? : 
शेवट माहित असूनही हा सिनेमा गुंतवून ठेवतो. सिनेमाची लांबी मोठी आहे. पण हा तुमच्या चेह-यावर हसू आणि आसू आणण्यात यशस्वी ठरतो.

Recommended

PeepingMoon Exclusive