‘ख़ाकी’ उसे क़ानून की ‘ज़ंजीर’ में ज़रूर ‘गिरफ़्तार’ करेगी, महाराष्ट्र पोलिसांनी दिल्या अमिताभ बच्चन यांना या खास अंदाजात शुभेच्छा

By  
on  

बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. अनेक दशकं लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या महानायकास आज ७७ वर्ष पूर्ण झाली आहेत. आज जगभरातून भारतीय सिनेसृष्टीच्या या महानायकावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच मुंबई पोलिसांनी त्यांच्या खास शैलीत ट्विटरवर अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

अमिताभ यांच्या सिनेमांच्या नावाचा उल्लेख करून गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा खास अंदाज मुंबई पोलिसांनी या शुभेच्छांमध्ये वर्तवला आहे. '‘बरसात की एक रात’ में, ‘कभी कभी’ अगर कोई ‘द ग्रेट गैम्ब्लर’, शहर की सुरक्षा से ‘ हेरा फेरी’ करने की कोशिश करेगा, तो ‘ख़ाकी’ उसे क़ानून की ‘ज़ंजीर’ में ज़रूर ‘गिरफ़्तार’ करेगी, हम आशा करते हैं की आपकी अप्रतिम अदाकारी का ये ‘सिलसिला’ यूँ ही चलता रहे #HappyBirthdayBigB' 

 

अशाप्रकारे मुंबई पोलिसांनी अमिताभ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज जगभरातून अमिताभ बच्चन यांना त्यांचे चाहते आणि इंडस्ट्रीमधले त्यांचे कलाकार मित्र आज शुभेच्छा देत आहेत. या महानायकाला पिपिंगमुन मराठीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Recommended

Loading...
Share