'कहानी 3' साठी  विद्या बालन आहे उत्सुक,योग्य कथेची आहे प्रतीक्षा  

By  
on  

अभिनेत्री विद्या बालन आपल्या खास अभिनय शैलीसाठी ओळखली जाते. प्रत्येक भूमिकांमधून आणि सिनेमांमधून ती आपला ठसा उमटवते. तिच्या अप्रतिम अभिनयाचं दर्शन नुकतंच प्रदर्शित झालेल्या 'मिशन मंगल' सिनेमातूनही घडलं. आता या सिनेमाच्या यशानंतर विद्या आपल्या आगामी सिनेमांच्या प्रोजेक्टस मध्ये बिझी आहे. सध्या ती भारताच्या महान गणिततज्ञ शकुंतला देवी यांच्या बायोपिकमध्ये शकुंतला देवी साकारण्याचं शिवधनुष्य विद्याने पेललं आहे. या सिनेमातला विद्याचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे. “ह्युमन कॉम्प्युटर'म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवी गणितातल्या तज्ञ होत्या. 

पण या सर्वांदरम्यान विद्याला नेहमी तिच्या कहानी सिनेमाच्या तिस-या भागाविषयी उत्सुकतेपोटी विचारणा होते. ह्यावर विद्या म्हणते, " हो मला पण उत्सुकता आहे, तिस-या भागाची. दिग्दर्शक सुजोय घोष तर सतत मला मी तिसरा भाग लिहायला घेतला आहे अशी धमकी देतो. मलासुध्दा तिसरा भाग नक्कीच करायचा आहे, पण ह्यासाठी एका उत्तम कथानकाची आम्हाला प्रतीक्षा आहे. मग तिसरा भाग करण्यास मज्जा येईल." 

शकुंतला देवींच्या लूकमध्ये विद्या खुपच कॉन्फिडन्ट दिसतेय. लाल रंगाची साडी आणि बॉब कट लूकमध्ये चेह-यावरचं स्मितहास्य यामुळे विद्या बालन शोभूनन दिसतेय. रिपोर्ट्सनुसार विद्याने या सिनेमाची शूटींग लंडनमध्ये सुरु केली आहे. 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share