Exclusive: प्रकाश झा यांच्या ‘एमएक्स प्लेअर’चा शो ‘डेरा’मध्ये बॉबी देओल झळकणार

By  
on  

अनेक बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच अभिनेता बॉबी देओलही आता दुस-या वेबसिरीज मध्ये झळकणार आहे. यापुर्वी तो 'क्लास ऑफ 83' या सिरीजमध्ये दिसला होता. आता पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार बॉबी प्रकाश झा यांच्या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. हरियाणातील तथाकथित आध्यात्मिक गुरु भगवान गुरमीत राम रहीम सिंह यांच्या जीवनावर हा शो आधारलेला आहे.

राम रहिम सध्या बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्याखाली तुरुंगाची हवा खात आहे. राम रहिमचा आश्रम डेरा सच्चा सौदा' च्या नावावर या वेबसिरीजचं नाव ‘डेरा’ असं ठेवलं आहे. राम रहिमच्या आध्यात्माच्या नावाखाली लपलेल्या कृष्णकृत्यावर या वेबसिरीजमधून प्रकाश टाकला जाणार आहे.

बॉबीने या सिरीजच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. बॉबीसोबत या सिनेमात अनुप्रिया गोयंका, सचिन श्रॉफ हे कलाकार दिसणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रकाश झा करत आहेत.

Recommended

Loading...
Share