दीपिका सांगते, 'माझ्या आई-वडिलांसमोर रणवीरला ह्या खास पोशाखच परिधान करावा लागतो'

By  
on  

बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंगच्या कपड्यांची नेहमीच चर्चा होते हे तुम्हाला आता वेगळं सांगायची गरज नाही. सिनेमा असो किंवा एखादं अवॉर्ड सेरेमनी रणवीरच्या ड्रेसींबद्दल नाही बोललो तरच नवल. कारण काहीतरी अतरंगी फॅशन करुन सर्वांचं लक्ष वेधून घेणं ही रणवीरची खासियत. पण खुप कमी लोकांना महितीय की, रणवीर जेव्हा आपल्या सासरच्या मंडळींसोबत असतो, म्हणजेच दीपिका पादुकोणच्या कुटुंबियांसोबत असतो तेव्हा त्याला त्याच्या मनाप्रमाणे नाही तर पादुकोण कुटुंबियांसारखे कपडे परिधान करावे लागतात. हे वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असणार, पण हे खरं आहे. 

अभिनेता रणवीर सिंहची पत्नी म्हणजेच अभिनेत्री दीपिकाला याबबात जेव्हा एका मुलाखती दरम्यान विचारणा झाली तेव्हा ती हसून म्हणते," होय. जेव्हा जेव्हा पादुकोण कुटुंबियांसोबत असतो.तेव्हा त्याला जीन्स आणि राऊंड नेक टी-शर्ट् असेच आउट्फिटसमध्ये राहावं लागतं. जर एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाला त्याला जायचं असल्यास काळ्या किंवा निळ्या रंगाची पँट, पांढऱ्या रंगाचे शर्ट किंवा कोणत्याही रंगाचा गोल गळ्याचा टी-शर्ट घालून तो येऊ शकतो”

  

 

रणवीर-दीपिका हे लवकरच ऑनस्क्रीन एकत्र झळकणार आहेत. आगामी ‘८३’ या चित्रपटात रणवीर व दीपिका पती-पत्नीच्या भूमिका साकारत आहेत. 

 

Recommended

Loading...
Share