सलमान खानच्या घराबाहेर निदर्शनं करणाऱ्या करणी सेनेच्या २० जणांना अटक

By  
on  

'बिग बॉस १३' हा रिअॅलिटी शो सध्या चर्चेत आहे. प्रत्येक सिजनप्रमाणे 'बिग बॉस'चं हे पर्व सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिजनमधील काही नियमांवर करणी सेनेने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे करणी सेनेतील काही सदस्यांनी या शो चा सूत्रसंचालक आणि बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर निदर्शनं केली. हा शो हिंदू संस्कृतीची प्रतिमा मलिन करणारा आहे असा आरोप करणी सेनेने या शो वर केला. सलमानच्या घराबाहेर निदर्शनं करणाऱ्या २० आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. 

बिग बॉसचं १३ वं पर्व सध्या जोरात सुरु आहे. बिग बॉस १३ मध्ये बेस्ट फ्रेंड्स फॉरेव्हर हि संकल्पना मांडण्यात आली. यानुसार स्पर्धकांना आपल्या आवडत्या जोडीदाराला निवडायचे आहे. यावेळी घरातील काही महिला सदस्यांनी पुरुष स्पर्धकांची निवड केली. त्यामुळे यापुढे बिग बॉसच्या घरात पुरुष आणि महिला एकत्र एकाच बेडवर असणे किती योग्य आहे, असा सवाल काही प्रेक्षकांनी उठवला. यामुळे #BoycottBiggBoss  हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. 

शो च्या माध्यमातून लव्ह जिहाद पसरवण्यात येत आहे तसेच हिंदू संस्कृतीची प्रतिमा मलिन करण्यात येत असल्याचा आरोप करणी सेनेने करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शो विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. आता मुख्यमंत्री या गोष्टींचा गांभीर्याने विचार करतात का आणि 'बिग बॉस १३' वर कारवाई होते का, याची सर्वांना उत्सुकता आहे. 

Recommended

Loading...
Share