3 करोडच्या चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेत्री अमिषा पटेलच्या विरोधात रांची कोर्टाने केलं अटक वाॅरंट जाहीर

By  
on  

अभिनेत्री अमिषा पटेलच्या विरोधात रांची येथील कोर्टाने फसवणुकीच्या संबंधी अटक वाॅरंट जाहीर केलं आहे. अमिषा पटेलने 3 करोडचा चेक बाऊंस केल्यामुळे तिच्याविरोधात कोर्टाने हे पाऊल उचलले आहे. वाॅरंट जाहीर झाल्यानंतर आमिषाला अटक करण्यासाठी रांची पोलीसदल अमिषाच्या मुंबई येथील घरी पोहोचली आहे. 

रिपोर्टच्या अनुसार अमीषा आणि तिचा मित्र कुणाल घुमरने फिल्ममेकर अजय कुमार सिंह यांच्याकडे 2.5 करोडचा चेक घेतला होता. सिनेमा रिलीज झाल्यानंतर मी पैसे परत करेन असा शब्द अमिषाने अजयला दिला. परंतु हा सिनेमा रिलीज झाला नाही तसंच जेव्हा अजयने आपल्या पैशांची मागणी केली तेव्हा अमिषाने त्याचे फोन उचलणं बंद केलं. एका प्रेस स्टेटमेंटमध्ये अजयने ही माहीती दिली. 

याचप्रकरणाचा छडा लावण्यासाठी रांची कोर्टाने अमिषा आणि तिचा मित्र कुणालला कोर्टात हजर राहण्यासाठी सांगीतले होते. परंतु वारंवार या दोघांनी कोर्टात गैरहजेरी लावल्याने शेवटी रांची कोर्टाने या दोघांविरोधात अटक वाॅरंट जाहीर केले. या प्रकरणाव्यतिरिक्त एका इव्हेंटचे पैसे घेतले असुनही इव्हेंटला उपस्थित राहु न शकल्याचा आरोप अमिषावर आहे. अलीकडेच अमीषा पटेल 'बिग बाॅस 13' मुळे चर्चेत आली होती.

Recommended

Loading...
Share