By  
on  

पाहा अजय देवगण आणि माधुरी दीक्षित यांनी शेयर केला 'हिरकणी'चा ट्रेलर

 शिवरायांच्या इतिहासात अनेक नावं आहेत जी सुवर्णाक्षरात लिहिली जातील. पण या इतिहासात एक ‘हिरकणी’ अशीही आहे जी स्वत:च्या तेजाने झळकते. याच ‘हिरकणी’ची गोष्ट दिग्दर्शक प्रसाद ओक पडद्यावर घेऊन आले आहेत. रायगडाचे दरवाजे  सूर्यास्तानंतर बंद झाल्यावर बाळाला भेटण्यासाठी काळोखात गडाचा खडतर प्रवास करुन खाली उतरणारी हिरकणीची ही शौर्यागाथा आहे.

 

याच 'हिरकणी'ची भुरळ आता बॉलिवूड सेलिब्रिटींना सुद्धा पडली आहे. बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण आणि सौन्दर्यवती माधुरी दीक्षित यांनी 'हिरकणी'चा ट्रेलर शेयर करुन प्रसाद ओक आणि सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. याच 'हिरकणी'ची भुरळ आता बॉलिवूड सेलिब्रिटींना सुद्धा पडली आहे. बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण आणि सौन्दर्यवती माधुरी दीक्षित यांनी 'हिरकणी'चा ट्रेलर शेयर करुन प्रसाद ओक आणि सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. ''तानाजी'साठी तयारी करताना मी इतिहासाच्या सुवर्णकाळाची ओळख करून देणाऱ्या मराठा पर्वाबद्दल खूप काही जाणून घेतलं. त्यामुळे याच इतिहासामधली शूर मातेची कहाणी असणाऱ्या 'हिरकणी'चा ट्रेलर शेयर करताना मला अभिमान होत आहे.', अशा शब्दांमध्ये अजय देवगणने 'हिरकणी'च्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

प्रसाद ओक दिग्दर्शित हिरकणी' हा सिनेमा २४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका कोण करणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive