By  
on  

सैफ अली खानच्या 'लाल कप्तान'च्या ट्रेलरला छोट्या तैमूरने ठेवलं हे नाव

सैफ अली खान च्या 'लाल कप्तान'ची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आजवर कधीही न पाहिलेल्या एका वेगळ्या अवतारात सैफ अली खान पाहायला मिळत आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात सैफ अली खानचा लुक अघोरी आहे शिवाय सैफ अली खान या सिनेमात जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. 

एका आघाडीच्या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने 'लाल कप्तान' संबंधी मजेशीर खुलासा केला. सैफ म्हणाला,"तैमुर लहान असल्याने तैमुरने हा सिनेमा बघितला नाही पाहीजे. परंतु 'लाल कप्तान' चा ट्रेलर तैमुरला इतका आवडला आहे की दिवसातुन दोनदा तैमुर हा ट्रेलर पाहतो. प्रत्येक रात्री तो आम्हाला 'मारा मारी'चा ट्रेलर बघायचाय असा हट्ट करतो."

 

नवदीप सिंह यांनी 'लाल कप्तान'चं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात सैफ अली खानसह सोनाक्षी सिन्हा, दीपक डोब्रीयाल आदी कलाकारांच्या महत्वपुर्ण भुमिका आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive