By  
on  

Birthday Special: 'बागबान'च्या शूटिंगच्या वेळी हेमा मालिनीचं सौन्दर्य पाहून अमिताभ बच्चन म्हणाले.......

बॉलिवूडमध्ये उमेदीच्या काळात नावारूपास येणाऱ्या नायिका उतारवयात मात्र चंदेरी दुनियेपासून अलिप्त असतात. परंतु अशा काही मोजक्या नायिका आहेत ज्या उतारवयातही स्वतःभोवतीचं वलय जपण्याचा प्रयत्न करत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत असतात. या मोजक्या अभिनेत्रींमध्ये 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. आज हेमा मालिनी यांचा वाढदिवस. वयाची सत्तरी पार केलेली ही अभिनेत्री आजही नृत्य, टीव्ही जाहिरातींच्या माध्यमातून सतत कार्यरत असतात. 

२००३ साली हेमा मालिनी यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'बागबान' सिनेमात लक्षवेधी काम केले. यावेळी हेमा मालिनी यांचं सौन्दर्य आणि प्रसन्नता बघून अमिताभ बच्चन यांनी त्यांचं कोतुक केलं होतं आणि म्हणाले होते,''आजही तुम्ही तुमच्या मुलींपेक्षा जास्त तरुण आणि सुंदर दिसत आहात.'

हेमा मालिनी दररोज योगा आणि व्यायाम करतात. तसेच आठवड्यातून दोन दिवस त्या उपवास करतात. या गोष्टींमुळे आजही हि 'ड्रीम गर्ल' हसतमुख आणि प्रसन्न असते. दरवर्षी कृष्ण फेस्टिवलमध्ये 'भरतनाट्यम' नृत्य करून त्या स्वतःच्या नृत्याच्या अदाकारीने प्रेक्षकांना आणि चाहत्यांना आकर्षित करतात. अशा या सुंदर आणि चिरतरुण अभिनेत्रीस पिपिंगमुन मराठीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 

Recommended

PeepingMoon Exclusive