By  
on  

पाहा video: अक्षयच्या अंगातलं भूत घालवण्यासाठी नवाजुद्दीनने कसली कंबर

‘हाऊसफुल 4’ च्या मेकर्सनी आता नवीन गाणं रसिकांच्या भेटीला आणलं आहे. एकदम धमाल मूड बनवणारं हे गाणं रसिकांच्या मनात उतरत आहे. या गाण्यात अक्षयच्या डोक्यावर चढलेलं भूत उतरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये मांत्रिक बनला आहे नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजुद्दीनचा या गाण्यात हटके अंदाज रसिकांना पाहायला मिळणार आहे.

 

यशिवाय त्याचा फेमस डायलॉग ‘कभी कभी लगता है अपुनईच भगवान है’ देखील रसिकांना ऐकायला मिळणार आहे. अक्षय मात्र या गाण्यात भूताला जाम घाबरलेला दिसत आहे. ‘मिका सिंगने या गाण्याला आवाजाने चार चांद लावले आहेत. या सिनेमात अक्षय कुमार सोबत रितेश देशमुख, बॉबी देओल, कृति खरबंदा, कृति सेनन, पूजा हेगड़े आणि चंकी पांडे  हे कलाकार दिसून येत आहेत. दिवाळीच्या मुहुर्तावर म्हणजेच 26 ऑक्टोबरला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive