By  
on  

'करवा चौथ' निमित्त अमिताभ यांनी शेयर केला जया बच्चन यांचा जुना फोटो आणि म्हणाले......

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर आपल्या विविध पोस्टमधून ऍक्टिव्ह असतात. कधी कधी जुने फोटो शेयर करत, कधी जुन्या सिनेमांच्या आठवणी जागवत अमिताभ त्यांच्या फॅन्सना नेहमीच आकर्षित करत असतात. आज सगळीकडे करवा चौथ उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्त अमिताभ बच्चन पोस्ट ना टाकतील तरच नवल. अमिताभ यांनी आजच्या करवा चौथ निमित्ताने जया बच्चन यांचा एक जुना फोटो शेयर केला आहे. 

जया बच्चन यांचा जुना फोटो शेयर करत अमिताभ त्यांनी या फोटोखाली मजेदार कॅप्शन लिहिलं आहे. या फोटोमध्ये जया बच्चन दिसत असून अमिताभ स्वतः दिसत नाही आहेत. बिग बी यांनी लिहिलं आहे,'माझं धर्मपत्नी. बाजूला उभ्या असलेल्या माणसाचं इतकं महत्व नाहीय त्यामुळे तो दिसून येत नाहीय', असं कॅप्शन अमिताभ यांनी लिहिलं आहे.

 

 

अमिताभ सध्या केबीसी च्या नव्या सीजनचं सूत्रसंचालन करत आहेत. या केबीसी मध्ये अमिताभ बच्चन सूत्रसंचालनाचा अंदाज पाहणं ही एक पर्वणी असते.  तसेच 'गुलाबो-सीताबो', 'ब्रम्हास्त्र', 'झुंड' आणि 'चेहरे' या चार हिंदी सिनेमांमध्ये अमिताभ बच्चन झळकणार आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive