By  
on  

सोनाक्षी सिन्हाने केलं ‘करवा चौथ’चं व्रत, कुणासाठी ते जाणून घ्या

 सलमानच्या आगामी ‘दबंग 3’ची वाट त्याचे फॅन्स आवर्जुन पाहात आहेत.  त्याचा हा सिनेमा दबंग फ्रॅचाईजीमधील तिसरा सिनेमा आहे. या सिनेमाच्या मेकर्सनी नुकतंच पोस्टर रिलीज केलं आहे. आज उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर करवा चौथ साजरा केलं जातं. या दिवशी पत्नी पतीसाठी उपवास करत असते. हाच मुहुर्त साधून फिल्म मेकर्सनी रज्जो म्हणजेच सोनाक्षी सिन्हाचा एक फोटो शेअर केला आहे.

 

या फोटोमध्ये सोनाक्षी सिन्हा चाळणीमधून चंद्राचं दर्शन घेत असल्याचा फोटो आहे. या फोटोला कॅप्शन देताना सोनाक्षी म्हणते, "रज्जो पांडे यानी श्रीमती चुलबुल पांडे की ओर से आप सभी पतिव्रता और #Dabangg पत्नियों को हैप्पी करवा चौथ’. या फोटोतील ब्लू कलरच्या साडीमध्ये खास दिसत आहे.

‘दबंग 2’ नंतर जवळपास 7 वर्षांनी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नडमध्येही प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा प्रभुदेवाने दिग्दर्शित केला आहे. चुलबूल ची दबंगाई रसिकांना 20 डिसेंबर 2019ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive