By  
on  

अक्षय कुमारचा हाऊसफुल 4 चा बॉक्स ऑफीसवर दिवाळी धमाका,100 कोटींच्या क्लबमध्ये होणार सामिल

साजिद नाडियादवाला आणि फाॅक्स स्टार स्टुडिओ यांचा धमाल काॅमेडीपट 'हाऊसफुल 4' दिवाळीच्या पार्श्वभुमीवर रिलीज झाला. लेटेस्ट बाॅक्स ऑफीस अपडेटनुसार 'हाऊसफुल 4'ने काल 34.56 कोटी इतकी कमाई केली. 'हाऊसफुल 4' मुळे अक्षय कुमारच्या करियरमध्ये आणखी एक सुपरहिट सिनेमा समाविष्ट झाला आहे. 

बाॅक्स ऑफीस तज्ञांनुसार दिवाळी सुट्टी तसेच आज असणा-या भाऊबीजमुळे बाॅक्स ऑफीसवर अक्षय कुमारचा 'हाऊसफुल 4' लवकरच 100 कोटी क्लबमध्ये दाखल  होणार  आहे. 

तसेच या शुक्रवारी सुद्धा 'उजडा चमन' व्यतिरीक्त बाॅलिवुडमध्ये कोणताही बिग बजेट सिनेमा रिलीज होणार नाहीय. याचा फायदा 'हाऊसफुल 4' निश्चितच होणार आहे. 'हाऊसफुल 4' हा आजवरचा पहिल्याच दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा काॅमेडीपट आहे.

 

Friday: 19.08 cr

Saturday: 18.81 cr

Sunday: 15.33 cr

Monday: 34.56 cr

Total collection: 87.78 cr

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive