By  
on  

श्रेयस तळपदे व्यस्त आहे ‘सरकार की सेवा मे’, जाणून घ्या काय म्हणतो तो

श्रेयस तळपदे माय नेम इज लखन या मालिकेतील अभिनयानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळला आहे. ‘सरकार की सेवा मे’ हे त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. यापुर्वी त्याने पोश्टर बॉईज हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. हा सिनेमा ख-या घटनेवर आधारित आहे. श्रेयस या सिनेमात मुख्य भूमिकेतही आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The Lion King Premiere #aboutlastnight #Timon @disneyfilmsindia Styled by - @riddhirgandhi

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27) on

 

ही गोष्ट अशा ड्रायव्हरची आहे ज्याला सरकारची सेवा करण्याची खुप इच्छा असते. पण ती पूर्ण न झाल्याने तो ड्रायव्हर बनतो. पण कर्मधर्म संयोगाने त्याला जबरदस्तीने हे काम करावं लागते त्यावेळी काय धमाल उडते हे या सिनेमातून दिसणार आहे. लखनऊमध्ये या सिनेमाचं शुटिंग लवकरच सुरु होणार आहे.

 

 

पुढच्या उन्हाळ्यापर्यंत हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात श्रेयस प्रमुख भूमिकेत आहेच. याशिवाय सुधीर पांडे, ब्रिजेंद्र काला, श्रद्धा जायस्वाल, अनिल चरणजीत, चेतन पांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive