By  
on  

सई ताम्हणकर दिसणार कृती सॅनॉन आणि पंकज त्रिपाठीसोबत

सई ताम्हणकर हे नाव बॉलिवूडला नवीन नाही. मराठीत सईच्या सिनेमांची चर्चा असतेच. पण आता बॉलिवूडमध्येही सई पाय रोवताना दिसत आहे. सईने या पुर्वी गजनी आणि हंटरमध्ये काम केलं आहे. आता ती ‘मिमी’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत कृती सॅनॉन आणि पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचं राजस्थानमध्ये शुटिंग सुरु आहे.

 

या सिनेमाच्या क्लॅप बोर्डचा फोटो सईने नुकताच शेअर केला आहे. लक्ष्मण उतेकर या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.  मराठी सिनेमा ‘मला आई व्हायचंय’ यावर मिमी हा सिनेमा बेतला आहे. सरोगसीवर आधारलेल्या या मराठी सिनेमाने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली होती. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive