By  
on  

सलमानच्या आगामी ‘राधे’ सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात हे कलाकार दिसणार सिनेमात

पीपिंगमूनने सर्वात आधी एक्सक्लुसिव्ह बातमी दिलेल्या सलमान खान, दिशा पाटनी, रणदीप हुडा आणि जॅकी श्रॉफ स्टारर ‘राधे’च्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. सलमानने नुकताच या टीमसोबतचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या सिनेमाचं शुटिंग मुंबई, दिल्ली, कलकत्ता, लखनऊ आणि जयपुरमध्ये होणार आहे. या सिनेमाबद्दल पीपिंगमूनने आधीच तुम्हाला माहिती दिली होती.सलमानच्या पोस्टने त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

 

सलमानच्या या सिनेमाचं नाव 'राधे: युवर मोस्ट वांटेड भाई' असं असणार आहे. कोरियन सिनेमा ‘आऊटलॉज’वर हा सिनेमा बेतला आहे. रणदीप हुडा या सिनेमात व्हिलनच्या भूमिकेत असणार आहे. राधे हा सिनेमा सलमानचा ‘वॉण्टेड 2’ असल्याचं बोललं जात आहे. पण या सिनेमाला राधे हे टायटल दिलं आहे. याला कारण वॉण्टेड हा सिनेमा बोनी कपूर यांची निर्मिती होती. पण मलायका अर्जुन प्रकरणामुळे सलमान आणि बोनी कपूर यांचे संबंध फारसे चांगले नाहीयेत. त्यामुळेच वॉण्टेडच्या सिक्वेलचं नाव सलमानने वॉण्टेड 2’ न ठेवता राधे ठेवलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive