By  
on  

माधुरी दीक्षितच्या हृदयाच्या जवळ आहे हा सिनेमा, शेअर केला हा व्हिडिओ

कलाकाराला त्याचे सगळेच सिनेमे आवडत असतात किंवा सगळ्याच व्यक्तिरेखांवर त्याचं प्रेम असतं. पण एखाद्या भूमिकेशी निगडीत असलेली खास आठवण कलाकाराला प्रिय असते. माधुरी दीक्षितचंही असंच काहीसं झालं आहे. माधुरीने नुकतंच तिच्या परिंदा सिनेमातील एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. या सिनेमात तिने पारोची व्यक्तिरेखा साकारली होती.

 

 

माधुरी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हणते, ‘ पारोने 30 वर्षांनंतरही माझ्या मनात खास जागा पटकावली आहे. पारोसारखं सक्षम स्त्रीची भूमिका साकारायला मिळणं हा माझ्यासाठी सन्मान होता. याशिवाय अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि विधु विनोद चोप्रा यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव उत्तम होता.’ माधुरी आणि अनिल कपूरच्या भूमिकेने सजलेला परिंदा आजही अनेकांच्या मनात घर करुन आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive