By  
on  

शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेख केल्याबद्दल अखेर सोनी टीव्हीने मागितली माफी

सोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती या शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे सोनी टीव्ही आणि शोचा नेटिझन्सनी चांगलाच समाचार घेतला आहे. याविरोधात सोनी चॅनेलवर बहिष्कार घालण्यासाठी #Boycott_KBC_SonyTv  हा हॅशटॅग़ ट्रेंड होत होता. मराठी सेलिब्रिटींसह अनेकांनी सोनी आणि केबीसीचा निषेध केला. वाढता दबाव पाहून सोनीने ट्वीट करत माफी मागितली आहे.

 

 

‘छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला एकेरी उल्लेख ही आमच्याकडून अनावधानाने झाली चुक आहे. त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करत आहोत. प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेता आम्ही कालच्या (गुरुवार)च्या एपिसोडमध्ये आम्ही माफी प्रदर्शन करणारा स्क्रोलही चालवला होता.’

 

 

या प्रकरणी अमिताभ बच्चन यांना सुनावण्यास नेटिझन्सनी मागे पुढे पाहिलं नाही.  हिंदू राजाचा अपमान आम्ही सहन करणार नाही, अशा तीव्र शब्दांमध्ये अनेकांनी या प्रकरणाचा निषेध केला होता. आता सोनी टीव्हीने माफी मागितल्यानंतर तरी नेटिझन्सचा राग शांत होईल अशी आशा करायला हरकत नाही.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive