By  
on  

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त निकने प्रियांकासाठी अरेंज केलं आहे खास सरप्राईज

प्रियांका चोप्रा- निक जोनासच्या लग्नाला बघता बघता एक वर्षं पूर्ण होईल. मागील वर्षी या लव्हबर्डसने 2 आणि 3 डिसेंबरला जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली होती. अत्यंत राजसी अशा या विवाहसोहळ्याचं प्रियांकाच्या फॅन्सनी खुप कौतुकही केलं होतं. 

आता या जोडीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस जवळ येत आहे. अशा वेळी हबी निकने प्रियांकासाठी खास सरप्राईज अरेंज केलं होतं. 'मिड वे' या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान निकने ही बाब चाहत्यांशी शेअर केली आहे. पण सरप्राईज काय असेल हे मात्र निकने सांगितलं नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My everything ️ #karwachauth

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

 

गेलं वर्षं निक आणि प्रियांकासाठी खुपच खास होतं. त्यांनी अनेकदा त्यांचे रोमॅंटिक फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. प्रियांका अनेकदा निकच्या कॉन्सर्टला देखील हजेरी लावत असते.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive