By  
on  

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आयुष्मानचा 'बाला', पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग

आयुष्मान खुराणा, यामी गौतम आणि भूमि पेडणेकरचा नुकतंच रिलीज झालेला 'बाला' सिनेमा नुकतंच रिलीज झाला आहे. रिलीज झाल्या झाल्याच 'बाला'ने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केले आहे. एकंदर सिनेमागृहात प्रेक्षकांना खेचून आणण्यात बाला यशस्वी झाला आहे. बालाने पहिल्याच दिवशी १०.१५ करोड इतकी कमाई केली आहे. 

'बाला'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सिनेतज्ञ तरण आदर्श यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून लिहिलं आहे कि,'पहिल्या दिवशी बालाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला आहे. पुढच्या दोन-तीन दिवसांमध्ये हा आकडा आणखी वाढू शकतो'

 

आयुष्मान खुराणाच्या आधीच्या सिनेमांनी पहिल्या दिवशी केलेले बॉक्स ऑफिस कलेक्शन: 

2019: बाला- 10.15 करोड 

2019: ड्रीम गर्ल- 10.05 करोड 

2018: बधाई हो- 7.35 करोड 

2019: आर्टिकल15- 5.02 करोड 

2017: शुभ मंगल सावधान- 2.70 करोड 

2018: अंधाधुन- 2.70 करोड 

2017: बरेली की बर्फी- 2.42 करोड 

Recommended

PeepingMoon Exclusive