By  
on  

‘सुर्यवंशी’च्या शुटिंग दरम्यान अक्षयला झाली दुखापत, प्राथमिक उपचार घेऊन पूर्ण केलं शुटिंग

 सुपरस्टार अक्षय कुमारच्या सिनेमात अ‍ॅक्शन भरपूर असते. पण त्याला अनेकदा या अ‍ॅक्शनसीनपायी दुखापतीलाही सामोरं जावं लागतं. असाच काहीसा किस्सा घडला आहे सुर्यवंशी सिनेमाच्या शुटिंगवेळी. 
या शुटिंगवेळी अक्षयच्या मासपेशींमध्ये तणाव जाणावल्याने शुटिंग थांबवावं लागलं. पण जिगरबाज अक्षय शुटिंग न थांबवता प्रथमोपचार घेऊन शुटिंग पुन्हा सुरु केलं.

 

सुर्यवंशीमधील एक अ‍ॅक्शन सीन शूट करताना अक्षयच्या मांसपेशी ताणल्या गेल्या होत्या. बाह्य जखम नसल्याने अक्षयने फिजिओथेरपिस्टच्या मदतीने मेडिकल टेप लावून शुटिंग पुन्हा सुरु केलं.

 

 

अक्षयच्या प्रोफेशनलाझिमच कौतुक सर्वत्र होत आहे. अक्षय सुर्यवंशीमध्ये एटीएस चीफची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. याशिवाय या सिनेमात रणवीर सिंह आणि अजय देवगण देखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive