'तानाजी' च्या नव्या पोस्टरसह उलगडला अजयच्या 100 सिनेमांचा प्रवास, काजल-शाहरुखने दिल्या शुभेच्छा

By  
on  

अजय देवगणचा बहुचर्चित सिनेमा तानाजीमधून नवं पोस्टर आज उलगडण्यात आलं. त्यासोबतच अजय आज आपल्या 100 सिनेमांसह बॉलिवुड इंडस्ट्रीतील आपली 30 वर्ष साजरा करतोय.  शाहरुखनेसुध्दा त्याच्या या सिनेकारकिर्दीसाठी ट्विटरद्वारे अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘तानाजी’चे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर अजय देवगणच्या आता पर्यंतच्या सर्व चित्रपटांच्या छोट्या-छोट्या फोटोंचे मिळून बनवलेले पोस्टर आहे.

शाहरुख सोबतच अजयची पत्नी काजोलनेसुध्दा त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ती म्हणते अभिमानाने  तुला 100 व्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा. काजोल आणि शाहरुख दोघांनीसुध्दा आपल्या पोस्टमध्ये एक व्हिडीओ शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@ajaydevgn #SoProud #LongJourney #ToManyMore

A post shared by Kajol Devgan (@kajol) on

मराठी साम्राज्याचा सिंह म्हणून तानाजी मालूसरे या योद्ध्याची आठवण काढली जाते. या जिगरबाज मावळ्याची गोष्ट आता मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत पड्द्यावर घेऊन येत आहे. सतराव्या शतकाचा हा काळ पड्द्यावर पाहाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तानाजी मालूसरेंची व्यक्तिरेखा अजय देवगण साकारत असून त्याचा या सिनेमातील लूक समोर आला आहे.

स्वराज्यासाठी स्वत:च्या मुलाचं लग्न लांबणीवर टाकणारा हा उमरठे गावाचा मावळा प्राणांची आहुती देतो. स्वराज्यातील कोंढाणा किल्ला मुघलांच्या तावडीतून सोडवण्यासाठी जीवाची बाजी लावतो. तानाजीने सिंहाची बाजी लावून जिंकलेल्या या किल्ल्याला त्यामुळेच ‘सिंहगड’ हे नाव दिलं गेलं. यावेळी पोस्टरमध्ये अजयचा योद्ध्याचा लूक समोर आला आहे.

या सिनेमात शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेची सगळ्यांना उत्सुकता आहे. हा सिनेमा 10 जानेवारीला प्रेक्षकांच्य भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share