By  
on  

स्क्रिप्ट लिहीतानाचा तानाजीसाठी अजय देवगण डोळ्यासमोर होता: ओम राऊत

अजय देवगणचा आगामी सिनेमा 'तानाजी: द अनसंग वॉरियर' हा अजयसाठी खूप खास असा सिनेमा असणार आहे. रुपेरी पडद्यावर अनेक दमदार भूमिका साकारणाऱ्या अजयसाठी 'तानाजी: द अनसंग वॉरियर' हा त्याचा १०० वा सिनेमा असणार आहे. या सिनेमात अजय तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. यासंबंधी ओम राऊत यांनी माध्यमांशी बातचीत केली असता त्यांनी अजय देवगण यांच्या निवडीविषयी खुलासा केला. 

ओम राऊत याविषयी म्हणाला,''२०१५ मध्ये मी तानाजी सिनेमाची पटकथा लिहायला सुरुवात केली. आणि त्यानंतर दोन वर्षांनी अजयला मी सिनेमाची पटकथा ऐकवली. अजयला सुद्धा सिनेमाची पटकथा खूप आवडली. तसेच जेव्हा मी तानाजीची पटकथा लिहीत होतो तेव्हाच माझ्या डोळ्यांसमोर अजय देवगणचं नाव होतं. या सिबेमात सैफ अली खान सुद्धा खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सैफ अली खानने रंगवलेला खलनायक नकारात्मक व्यक्तिरेखेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो.''

'तानाजी: द अनसंग वॉरियर'  मध्ये अजय देवगण, सैफ अली खानसह अभिनेत्री काजोल सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे. हा सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive