By  
on  

पाहा Video: 'सुर्यवंशी'च्या सेटवर अक्षय कुमार-रोहीत शेट्टीमध्ये झाली हाणामारी, करण जोहर म्हणतो...

दिग्दर्शक रोहीत शेट्टीच्या 'सुर्यवंशी' सिनेमामध्ये अक्षय कुमार प्रमुख भुमिका साकारत आहे. 'सिंघम', 'सिंबा' नंतर रोहीतच्या या आगामी काॅप सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. परंतु 'सुर्यवंशी' च्या सेटवरचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक रोहीत शेट्टी आणि अक्षय कुमारमध्ये हाणामारी झालेली दिसुन येत आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#BreakingNews - A fallout which might just make your day @itsrohitshetty @katrinakaif

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

परंतु या हाणामारीमागचं खरं कारण ऐकुन तुम्ही चकीत व्हाल. एका आघाडीच्या वेबसाईटने, सुर्यवंशीच्या सेटवर रोहीत-अक्षयमध्ये भांडण झाल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं. या बातमीला अक्षयने रोहीतच्या साथीने हा व्हिडीओ करुन त्याच्या खास अंदाजात उत्तर दिलं. रोहीत आणि अक्षय या व्हिडीओमध्ये एकमेकांना खोटं खोटं मारत असुन या व्हिडीओची सुरुवात कतरीना कैफ करते. त्यानंतर एकमेकांना मारताना 'हमे लडना है, हमे लडने दो हमारी लडाई होना जरुरी है' असं मिश्किल अंदाजात एकमेकांना बोलताना दिसुन देत आहे. 

 

या व्हिडीओवर करण जोहरने "या भांडणात मी सुद्धा मध्यस्थी करु शकत नाही' असं मजेदार ट्वीट केलं आहे. एकंदरीत अक्षय-रोहीतच्या या व्हिडीओवर अनेक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. रोहीत शेट्टी दिग्दर्शित 'सुर्यवंशी' मध्ये अक्षय कुमार-कतरीना कैफ प्रमुख भुमिकेत झळकत आहेत. हा सिनेमा 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive