By  
on  

रणवीर-दिपीका भारतातील या खास ठिकाणी साजरा करणार लग्नाचा पहिला वाढदिवस

दिपीका पादुकोण आणि रणवीर सिंग हे बाॅलिवुडमधलं सर्वात हाॅट कपल. सतत नवनवीन पोस्ट टाकुन त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. या लाडक्या जोडीचा अर्थात 'दिपवीर'चा लग्नाचा पहिला वाढदिवस 14 नोव्हेंबर रोजी आहे. त्यानिमित्ताने हे दोघे आपल्या वेडींग अॅनिव्हर्सरीचा प्लॅन आखत आहेत. 

सर्वांनीच अशी अटकळ बांधली असेल की हे परदेशात लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करतील. पण नाही... दिपीका आणि रणवीर लग्नाचा पहिला वाढदिवस अत्यंत खास प्रकारे आणि विशेषतः भारतात साजरा करणार आहेत. 

लग्नाच्या वाढदिवशी रणवीर-दिपीका तिरुपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. तिथे ते बालाजी आणि पद्मावती देवीचं दर्शन घेणाल आहेत. त्यानंतर पुढच्या दिवशी सहकुटूंब हे दोघे अमृतसर येथील सुवर्णमंदिराला भेट देऊन त्याच दिवशी मुंबईत परतणार आहेत. 

गेल्या वर्षी 14 नोव्हेंबरला या दोघांनी एकमेकांशी लग्न केले. त्यांचं लग्न खुप कारणांनी चर्चेत राहीलं. लवकरच ही जोडी '83' सिनेमात झळकणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive