By  
on  

पाहा Video: मराठा साम्राज्यातील लढ्वय्यांची गर्जना घुमणार ‘मर्द मराठा’ या गाण्यात

मराठ्यांच्या पराजयाच्या गोष्ट सांगणा-या पानीपत सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आता या सिनेमातील नवं गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. या सिनेमातील ‘मर्दमराठा’ हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात मराठी साम्राज्याचे मातब्बर सरदार आणि वैभव यांचं दर्शन घडतं. या सिनेमात अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. 

 

 

अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. अजय-अतुल, कुणाल गांजावाला, स्वप्नील बांदोडकर, सुदेश भोसले, पद्मनाभ गायकवाड, प्रियांका बर्वे या गायकांचा आवाज या गाण्याला लाभला आहे. गाण्याचा बाज स्फुर्तीगीताचा असला तरी त्याला उत्तम संगीताची किनार लाभली आहे. या गाण्यात रवींद्र महाजनी, गश्मीर महाजनी, अर्चना निपाणकर, मिलिंद गुणाजी हे मराठी चेहरे दिसत आहेत.

 

या सिनेमात संजय दत्त अहमद शाह अब्दाली तर अर्जुन कपूर सदाशिवरावांच्या भूमिकेत दिसणार आहे. गश्मीर महाजनी या सिनेमात जनकोजी शिंदे तर रवींद्र महाजनी मल्हारराव होळकर ही व्यक्तिरेखा साकारणार हे स्पष्ट झालं आहे. पानीपतच्या युद्धाचा थरार पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांना 6 डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागेल.

Recommended

PeepingMoon Exclusive